Date: July 30, 2024
लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी कळंब-वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील विद्यार्थ्यांनी GPAT-2024 च्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याची माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर यांनी दिली.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्सामीनाशन्स इन मेडिकल सायन्सेस,नवी दिल्ली यांच्या मार्फत GPAT परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत फडतरे फार्मसी कॉलेजचे किरण महादेव उमप, तृप्ती मालोजी शेलार या विद्यार्थ्यांनी GPAT परीक्षेत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतभर औषधनिर्माण शास्त्र विषयात पदवीत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत दर महिना शिष्यवृती दिली जाते. परीक्षेसाठी प्रा.उल्का मोटे यांनी विशेष मार्गदर्शन केले होते. त्याचबरोबर प्रा. मीराबाई देवकर, प्रा.मयुरी रुपनवर, प्रा. वैष्णवी चोपडे, ग्रंथपाल प्रा.तुषार साबळे आदींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. GPAT परीक्षेत यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. प्रवीण उत्तेकर तसेच सर्व प्राध्यापकांनी विध्यार्थाचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.